Sunday, January 23, 2011

नामदेव मल्हारजी म्हात्रे (...भाग १...)

आपल्या लाईफ मधल्या घटना आणि त्यात भेटणारी माणसं जर आपल्याला निवडता आली असती तर अ‍ॅट-लीस्ट मला तरी बोर झालं असतं. निसर्गानं असं काही आर्कीटेक्चर बनवलय, की जे कोणी आपल्याला भेटतं, त्याचं काही-ना-काही कारण नक्की असतं. म्हणजे लगेच प्रत्येक नात्यात ‘आपलं काही काम निघतय का!’, हे शोधायला सुरु करा असं मी मुळीच म्हणणार नाही. लोकं भेटत जातात, नाती बनत जातात. इट्स यू, हू हॅज टू डिसाईड अ‍ॅन्ड जस्ट मेनटेन दोज रीलेशन्स. माझ्या आयूष्यात इतरांसारखेच बरेच लोक आले, पण काही लोकं च्यूविंग-गम केसांना चिकटावं तसं चिकटतात.


मला पहिली कंपनी ही कॅम्पस मधेच मिळाली. आई-वडीलांच्या अशिर्वादाने आणि आई भवानीच्या क्रुपेनेच उच्च शिक्षण पूर्ण झालं, कारण त्यासाठी कष्ट केल्याचं मला तरी काही आठवत नाहीये. मग आला ‘इंडक्शन प्रोग्रॅम'. ज्यांना हे काय असतं ते माहीत नसेल तर सांगतो. ‘इंडक्शन प्रोग्रॅम’ म्हणजे फ्रेशर लोकांना कम्पनी मधे हळूवारपणे सामावून घेण्याचं तंत्र. म्हणजे ते बावरून जाऊ नयेत, आणि कंपनी बद्दल ‘आहाहा... काय कंपनी आहे आपली! काय पोरी आहेत इथल्या!’ असाच गोड गैरसमज निर्माण करण्याची आयडीया. तर असाच ‘इंडक्शन प्रोग्रॅम’ माझ्या पहिल्या कंपनीने शिमल्याला ठेवला होता, ते देखील संपूर्ण एक महिना. एकूण ३५० भारतीय पोरं-पोरींना इथे एकत्र आणलं होतं. एका कॉलेजच्या हॉस्टेल मधे आमची राहायची सोय केली होती. जॉयनिंग फॉर्म भरून घेणं चाललेलं. माझ्या सोबत अजून सात जणं आमच्या कॉलेजचे इथे सिलेक्ट झाले होते. मी नाव लिहीणार तोच अचानक माझ्या फॉर्म, पॅन्ट आणि उजव्या खांद्यावर काळ्या शाईचे ठिपके प्रकट झाले.

‘तुझ्या ***, कोण केलं रे हे!’ असं बोंबलतंच मी उठलो. मागे पाहिलं तर काही पोरी फॉर्म्स भरत होत्या आणि त्यांच्याकडे तर बॉलपेनं होती. त्यात एक-दोन दिसायला लईच भारी होत्या त्यामुळे मी पुढची शिवी आवरली. पण मुख्य गुन्हेगार पसार झालेला.

‘कंपनीच्या पहिल्याच दिवशी काळी शाई अंगावर म्हणजे चांगलं लक्षण नाही सम्या!’ असलं अपशकूनी बोलणं फक्त धर्मेशंच करू शकतो. हा माणूस कधीही बघावं तर दुसर्याच्या फाटलेल्या पॅन्ट कडेच बोट दाखवताना सापडलाय मला. एक नंबरची सॅडिस्ट असतात काही माणसं यार. मला सवय झालीये म्हणून मे दुर्लक्ष केलं, पण त्या गडबडीत तो माणूस सापडलाच नाही. तण-तणतच मी दुसरा फॉर्म घेतला आणि भरायला बसलो. अर्धाच भरून झाला होता आणि,

‘म्हात्रे नामदेव मल्हारजी... आईचा घो! चायला चुकून राहिलं ना नाम्या, काय करायला!’ असं स्वत:शीच शेजारी कोणीतरी ओरडलं.

इतक्या मोठ्या कंपनीत आल्यावर सुद्धा कोणाचं चालतय हे थोबाड, हे बघायला जवळपास सगळेच वळाले. बाकीचे जे नाही वळाले ते अमराठी होते ते ओळखलं. लाईट-पिंक टी-शर्ट, फॉर्मल काळी पॅन्ट, काळा रंग, आणि हातात काळं शाई-पेन घेऊन हा माणूस फॉर्म भरताना मला दिसला. च्या मारी, सापडला की राव! ते पेन बघून मी ठरवलेलं की ह्याला नंतर हटकायचं. पण त्यानेच माझ्याकडे पाहिलं आणि थोडा स्माईल दिला. मग फॉर्म घेऊन माझ्या जवळ येऊन बसला.

‘इज धिस ट्रू? माय सर-न्येम इज म्हात्रे.’, माझ्या समोर त्याने फॉर्म धरलेला.

मी पूर्ण ब्लँक झालो, ‘म्हणजे काय!’, असं मी थोडं इरीटेट होऊन आणि चेश्टेच्या सुरातच बोललो.

मराठी सापडलेला पाहून तो थोडा निवांत झाला ‘अरे म्हनजे इथे सर-नेम ची जागा नाही ना, म्हनून विचारलं मी.’

‘अरे लास्ट-नेम आहे की.’

डोळे मोठे करून, मी अत्यंत हुशारीचं काहीतरी बोललो आहे असा त्याचा चेहेरा झाला एकदम, ‘आयला लाश्ट-नेम इज ईक्वल टू सर-नेम, हे मला ठाऊक नव्हतं ल्येका!’

‘ह्या असल्या आयटमला इतक्या मोठ्या कंपनीत सिलेक्ट तरी कसं केलं!’ हे आम्ही नंतर बराच वेळ एक ईगोइस्टिक-डिस्कशन केलं. आम्ही बाकी राज्यातल्या पोरीन बरोबर इंट्रोड्यूस होत असताना माझं लक्ष नाम्याकडे गेलं. एका झाडाखाली त्याच्या आई, वहीनी, किंवा बहिणीनं दुधाच्या पिशवीत बांधून दिलेलं थालीपीठ खात बसलेला तो.

हॉस्टेलच्या रूमचा नंबर समजला आणि मी रूम मधे गेलो, तर समोर बेडवर ओळखीचा लाईट-पिंक टी-शर्ट दिसला. ‘शिट!’ येवढाच आवाज तोंडातून आला. एक अख्खा महीना नाम्या बरोबर! नो वेज डूड! कुणालाही समजायच्या आत मी रूम पटकन बदलून घेतली आणि म्हात्रे एकटाच त्या रूम मध्ये राहू लागला. फक्त पंधरा दिवस झालेले जेंव्हा आम्ही शिमल्यात धिंगाणा घालत होतो आणि मला अचानक नाम्या सूटकेस घेऊन रीक्शात बसताना दिसला. मी विचारलं तर थोडा थांबला, काहीतरी विचार केला, एक सुसकारा टाकला आणि म्हणाला ‘बाप मेला मित्रा, परत चाललो.’ इतकच बोलला आणि शेक-हॅन्ड करून त्याची रीक्षा निघून गेली. पूर्ण पंधरा दिवसात कोणाशीच मैत्री न करता नाम्या वेन्ट अवे.

आज त्या सगळ्याला पाच वर्ष उलटून गेली. तो इंडक्श्न प्रोग्रॅम आता फेस-बुक किंवा पिकासा मध्ये मधून-अधून दिसुन येतो. आपण किती बालीश होतो आणि आपल्यात किती मोठा फरक पडलाय हे देखील लगेच समजतं. म्हणजे दिसण्यात बरका, बालीशपणा बद्दल नो कमेन्ट्स! Maturity of thoughts is never dependent on years of work experience. आपण किती मॅच्यूअर आहोत हे सिच्यूवेशन दाखवते, व्हेयर पीपल हार्डली पास दॅट टेस्ट. असो!

पण आजपेक्षा थोडं मागे जातो. अंदाजे तीन वर्षापूर्वी एके दिवशी अचानक, माझ्या जुन्या कंपनीत डेटबेसवाल्या मुलानी पेपर टाकले. पेपर टाकले म्हणजे लगेच पहाटे सायकलीवर, गारठ्याचं, पावसा-पाण्याचं तो घरो-घरी पेपर टाकत सुटला असं नाही. आमच्या इंडस्ट्रीत ‘पेपर टाकणे’ हे ‘रीझाईन करणे’ ला समानार्थी असतं. तर आमच्या डेटाबेसवाल्या पोरानी रीजाईन केलं. प्रोजेक्ट ऐन रंगात असताना, त्याच भांडण आमच्या पी.एम. बरोबर झालं आणि त्याने आपला रंग दाखवला. मग काय, नवीन माणूस शोधणं आलं की! तोंडावर लग्न आहे आणि घरात अर्धी रूम रंगवून झाल्यावर अचानक रंगार्याचं भांडण त्याच्या कंत्राटदारा सोबत झालं, आणि तो तण-तणंत निघून गेला तर भिंत कशी दिसेल, तसा आमचा प्रोजेक्ट दिसू लागला. एखाद्या आठवड्यानंतर नवा माणूस येणार असं कळालं. ‘खूप कडक इंटरव्ह्यू घेतलाय मी’ असं आमचा एक सिनीयर मला म्हणाला. ह्याचा स्वत:चा इंटरव्ह्यू कोण घेतला हे आधी आम्हाला शोधायचं होतं. अरे डीझाईनींग जो माणूस फक्त पेन्ट-ब्रश मधेच करू शकतो; ज्याच्या ई-मेल पुढे स्पेल-चेकनी सुद्धा हात टेकले आहेत आणि जो दिवसभर फेसबुकचा उपयोग मॅट्रीमोनी साईट सारखा करत बसलेला असतो, असा माणूस होता हा. त्याची चॉईस आहे म्हटल्यावर आम्हीच पेपर टाकायचा विचार करत होतो. काही दिवसांनी आला तो माणूस समोर. आम्ही पहिल्यांदाच भेटत होतो. मी माझं नाव सांगितलं आणि तो चार-चौघात एकदम म्हणाला

‘आय नो यू बरका! वी ह्याव म्येट बिफोर समीर’, अस्सल गावरान मराठ्मोळ्या इंग्लिश मध्ये त्याने ओपनिंग स्टेटमेन्ट केलं. साक्षात नाम्या माझा समोर उभा आहे हे बघून मला धक्काच बसला. 

‘आय अ‍ॅम सॉरी आय डिडन्ट रेकगनाईज यू अ‍ॅट फस्ट!’, एक नजर पी.एम. वर ठेवून मी आवाजात जरा सॉफिस्टिकेशन आणून म्हणालो.

‘त्यात काये येवढं, यार! अरे ल्येका दोन्ही पैकी काहीच दांडगं नाही ना आपल्यात; ना माझी पर्सन्यालिटी, ना आपली ओळख. कशाला टेन्शन घेतो!’ आणि मग त्याचे काळे ओठ, थोडेसे पिवळे दात-कम-आवलीपणा दाखवत हसले. हे स्टेटमेन्ट मारल्या बरोबर सगळेच भेदरलेल्या नजरेनी आमच्या सिनीयर कडे बघू लागले; ज्याने ह्याला सिलेक्ट केलं होतं. पी.एम. नी रुमाल काढला आणि बहुतेक त्याचं अप्रेजल चुलीत गेल्याचं त्याला एखादं छोटसं स्वप्न देखील पडलं. त्याने घाम टिपला आणि मलाच ‘प्लीज टेक केयर’ असं म्हणून निघून गेला. म्हणजे केयर नक्की कोणची घ्यायची होती; नाम्याची, प्रोजेक्टची, का स्वत: माझी. आहो टीम-लीड म्हटल्यावर मॅनेजर काय अवाजवी एक्सपेकटेशन ठेवतील सांगता येत नाही!

आठवडा उलटून गेलेला आणि नामदेव म्हात्रे नुसताच डेटबेस न्याहाळत बसलाय हे दिसू लागलं. काम पुढे सरकेचना. बरं एखादी तरी ईमेल यावी त्याच्याकडून, तर ते सुद्धा नाही. सगळी टीम ‘काही खरं नाही! काही खरं नाही!’ हेच बोलताना दिसत होती. मग एके देवशी मला आणि नाम्याला पी.एम. कडून एक ईमेल आली. नाम्याच्या प्रोग्रेसवर डाऊट येऊ लागलेला म्हणून एक टीम मीटिंग बोलावली. खात्री होती आम्हाला, की नाम्याला लवकरच लाथ बसणारे. मीटिंग-रूम गच्चं भरलेली, पण सगळे शांत. मग नाम्याकडे बघून पी.एम. नी विचारलं, ‘प्लीज टेल द स्टेटस नामदेव. दहा दिवस झाले आता.’

आणि मग मल्हारजींचे सूपुत्र बोलले ‘आय डोन्ट थिंक वी कॅन प्रोसीड लाईक दिस! पार लावून ठेवलीये डेटाबेसची!’ आवंढा गिळताना सुद्धा इतका त्रास होवू शकतो हे मला त्या दिवशी समजलं. आमचा पी.एम. आधीच गोरापान. त्याच्या कानाच्या लाल रंगावरून त्याच्या अंगाच्या टेम्प्रेचरचा अंदाज आला. ‘अरे पण मग तू हे आधी का नाही बोललास!’ पी.एम. भडकला होता, ‘तुला म्हणून तर रीक्रूट केलेलं, सो दॅट यू विल टेक केयर. दहा दिवस झाले नामदेव, आणि आज मी मीटिंग बोलवल्यावर तू हे सांगतोस की प्रोजेक्ट असा प्रोसीड होवू शकत नाही म्हणून. आय अ‍ॅम गोइंग टू गो क्रेजी नाव!’ सगळी रूम शांत आणि स्तब्ध. सगळेच जणं जमिनीकडे बघून, एक-मेकांना आणि खास करून पी.एम. च्या नजरेला टाळत होतो, आणि तेवढ्यात नाम्या बोलला ‘मी प्रोजेक्टबद्दल काहीच बोललो नाहीये अजून. मी म्हणालो आय डोन्ट थिन्क वी कॅन प्रोसीड लाईक दिस. म्हणजे आय ह्याव अनादर सोल्यूशन. डोन्ट वरी!’ आणि वर त्या शांततेत तो जोरात हसला. पी.एम. नी हताश-स्टाईलमधे डोकं हालवलं आणि तो काहीच न बोलता बाहेर निघून गेला. स्वत: शांत न राहाता, टीमला सुद्धा पॅनिक कसं करायचं हे आम्ही त्याच्याकडूनच शिकलो. रूम मधून बाहेर आलो आणि सरळ खाली टपरीवर चहा प्यायला एकटाच गेलो. अर्धा कटिंग चहा हातात घेऊन मी जमीनीकडे नजर खिळवून बसलेलो. अप्रेजल बोंबललय हे क्लीयर दिसत होतं. 

‘टेन्शन घेऊ नकोस मित्रा, आपण करू सगळं नीट.’ एका हातात सिग्रेट आणि दुसर्या हातात मशीनची कॉफी घेऊन नाम्या शेजारी आला होता.

पुढचे पंधरा दिवस आणि रात्र कसे गेले समजलंच नाही. काम दनादन सुरू झालं आणि हाईट म्हणजे द प्रोजेक्ट वेन्ट परफेक्ट. क्लायंटची कौतुकास्पद मेल सुद्धा आली आणि वर त्याचा कडून नवा प्रोजेक्ट सुद्धा आला. पी.एम. नी झकास पार्टी वगैरे दिली. नाम्या एकदम हीरो झाला. आम्ही सगळ्या पोरांनी त्या रात्री कुलाब्याला एका बार मध्ये नुस्ता दंगा केला. तिथून रात्री दीडला, बॅन्ड-स्टॅन्डला बाईक्सवर गेलो. नाम्या आणि मी नुसते हसत सुटलेलो. नाम्या पीऊन आणि मी न पीताच नशेत होतो. यशाचा नशा!

मध्यरात्री वाशीच्या रूमवर परत आलो आणि मी नाम्याला विचारलं, ‘गड्या तू पहिले दहा दिवस काहीच कसं नाही बोललास. तुझा प्लॅन जर तू पी.एम. ला सांगितला असतास तर शिव्या नसत्या बसल्या.’

‘शेत पेरन्या आधी जमिनीचा अंदाज तर घ्यावाच, पन त्या अदूगर नको असलेलं गवत उपटनं आनी जमीन साफ करनं जास्त गरजेचय. मी आधीच्या त्या डेटबेसवाल्याची घान, आधीचे तीन दिवस पाहिली, आनी मग सात दिवस साफ केली. यू शुड फश्ट श्टेयर याट द शी, बिफोर शेलिंग इन वाईल्ड वॉटर्स! म्हन्जी, वादळात नाव सोडन्या अदुगर समिंद्राकडं एकदा बघनं फार गरजेचं असतय गड्या!’ मी डोळे मोठे करून त्याच्याकडे पहातच राहिलो. ‘काय झालं असं पहायला?’ नाम्यानं विचारलं. 

‘मी फार मोठी गोष्ट शिकलो नाम्या आज.’

‘काय? माझं समिंद्राचं वाक्य ना? हा, मला पन त्ये लईच पटल्येलं. फार भारी आहे त्ये वाक्यं.’ नाम्या भुवया उंचावून मला सांगत होता.

‘ते नाही रे. कुणाच्या चेहेर्यावर कधी जायचं नाही हे शिकलो!’, माझा चेहेरा अ‍ॅज यूज्वल मिश्किल होत चाललेला मलाच जाणवत होता.

नाम्या हसत-हसतच म्हणाला ‘आयला राव सम्या, म्हन्जी मी चेहेर्यावरून खुळा वाटलो होय र तुला. तुम्ही पुनेकर कधी काय बोलाल सांगता येत नाही!’ 

दोघांनाही झोप येत नव्हती आणि दुसर्या दिवशी सुट्टी होती. रात्रीचे तीन वाजलेले. आम्ही सी.डी. लावली आणि ‘कॅच मी इफ यू कॅन’ पहात बसलो. सगळा सिनेमा मला सीन-बाय-सीन त्याला समजावून सांगावा लागलेला.

दोन-अडीच महिने उलटून गेलेले आणि सम्या-नाम्या ही जोडी पूर्ण कंपनीत फेमस झालेली. कुठेही जा, आम्ही एकत्र. काही दिवसांनी माझ्या रूम-मेटला ऑन-साईट मिळालं आणि तो अमेरीकेला गेला. नाम्या माझ्या सोबत लेगचंच शिफ्ट झाला. वी बिकेम बेस्ट फ्रेन्ड्स! त्याच्या सोबत कधीच काही टेन्शन नाही झालं. ना पैशाची घासा-घीस, ना सतत हिशोबाची कट-कट. आठवड्यातून त्याची एकदा दारू आणि थियेटर मधे आमचा एक पिक्चर. ‘पुनेकर असून बर्यापैकी पैसा खर्च करतोस ल्येका तू. एखाद-दिवशी तुमच्या महापौराला कळलं तर हाकलेल तुला शहराबाहेर. इट डजन्ट सूट यूवर पुनेकर पर्सन्यालिटी!’, ही असली वाक्य हा मला नेहेमी ऐकवायचा. स्वत: बुलडाना जिल्ह्यातल्या एका छोटाशा गावतला आहे हा.

मार्च ते मे, हे अप्रेझलचे महिने. जस्तीत-जास्त पगारवाढीपेक्षा, कंपनीला आणि मॅनेजमेन्टला जस्तीत-जास्त शिव्या घालण्याचे हे महिने. अप्रेझल-इंटरव्यूसाठी नाम्याला बोलावणं आलं. इंटरव्यूला आमचे पी.एम., डेटाबेसचे पी.एम. आणि प्रोजेक्ट-लीड असे बसलेले. ह्या इंटरव्यूच्या मार्कांना रेटिंग असं म्हणतात. नाम्याचे मार्क उर्फ रेटींग आलं. अगदी बेस्ट मार्क्स आणि पगारवाढ घेऊन साहेब प्रमोट झाले. हे काही केल्या आमच्या प्रोजेक्ट-लीडला पटंत नव्हतं. मी नाम्याला विचारलं,

‘काय रे, आपला प्रोजेक्ट-लीड तुझ्यावर सतत खेकसत का असतो? तू नक्कीच अप्रेझल मध्ये तोंड फाडलं दिसतय.’

नाम्यानी चहाचा घोट घेतला आणि म्हणाला, ‘अबे ते च*** का नाही भडकनार! त्याचा अप्रेझल डेटा पाहिलाय मी. हातावर तम्बाखू ठेवालिये कंपनीनं त्याच्या, आणि तोंडाला चुना फासलाय पी.एम. नं. माझं अप्रेझल पाहून जळतंय तिचायला!’

‘पण नक्की झालं काय इंटरव्यू मध्ये?’

‘अबे मला आधी ह्यानं कमी मार्क दिले बरका. मी विचारलं, काऊ मुन? तर म्हनला कमुनिकेशन स्किल्स खूप वीक आहेत तुझ्या...’

नाम्याच्या इंटरव्यूचा किस्सा म्हटल्यावर दंगा असणार, मी चहाचा लास्ट घोट गटकला आणि पुढे ऐकू लागलो.

‘... तर मी म्हनालो, दोन मिनीट दे मी माझ्या सगळ्या ईमेल प्रिन्ट मारतो. जश्ट टेल मी व्हेर माय ग्रामर इज रॉन्ग. जश्ट टेल मी व्हेर द क्लायंट डिड नॉट अंडरश्ट्यान्ड माय ल्यान्गवेज...’

सिगरेटचा कश मारत नाम्या कंटीन्यूड, ‘... तर ते लीड मला म्हनलं, ते सगळं ठीक आहे पन तुझी वर्बल, म्हन्जी बोली भाषा, इम्प्रूव होनं गरजेचं आहे. मी म्हनालो, ते शक्य नाही. शेतातल्या मातीचा वास तर मार्केटच्या भाजीला सुद्धा येतो, तर माझ्या भाषेला का नसंल! दॅट इज हू आय याम! अ‍ॅन्ड इफ यू फील द्याट इज द प्रॉब्लेम देन द्याट इज यूवर प्रॉब्लेम, नॉट माईन. कमुनिकेशन इज अबाऊट पुटिंग फॉरवर्ड द मेसेग. त्यो मेसेज जर समजला, तर तू पन जिकला अन मी पन. झाली की ल्येका तुमच्याच म्यानेजमेन्टची ‘विन-विन’ सिचूवेशन. म्हनून चिडलय त्ये, कारन माझं कमुनिकेशन साहेबाला पटलं, ह्या ह*** ला नाय ना!  कॉनफिडन्स आणि ट्यालेन्ट महत्त्वाचं, काय! अ‍ॅन्ड प्लस आय अ‍ॅम ट्राईंग टू इम्प्रूव.’

हे चालू असतानाच मी हसून-हसून वेडा होत होतो. धिस मॅन इज सो सिम्पल येट सो इफेक्टिव अ‍ॅन्ड डायनॅमिक! काय लागतं अजून काम करायला! अ‍ॅन्ड येस, ही वॉज इनडीड इम्प्रूविंग.

नाम्याबद्दल अजून सांगण्यासारखे खूप किस्से आहेत यार, पण जरा निवांत बोलूया.

(क्रमश:)

आवड-नावड कमेन्ट्स मध्ये कळवा यार नक्की! नुसत्या गोड बोलण्याने प्रगती आणि सुधारणा होत नसते. राईटिंग इज अ‍ॅन आर्ट विच डेफिनेटली नीड्स मोटीवेशन, बट विथ शूअर स्कोप फॉर इम्प्रूवमेन्ट. तर जरूर सांगा.

14 comments:

 1. sam yek no re mitra.... mast wakya rachana ahe..sadhi ani sopi...

  sakal muktpith la tuz likhan pathav te tula aajun wav detil...

  ReplyDelete
 2. Like Like Super Like !!! Kasa yaar ekdum mast suchtay tula !! 1st sentence itself is too gud !!
  just superb !! Waiting for ur next blogs !!

  ReplyDelete
 3. Hats off to your sense of humour! About flaws, well let's discuss it some other day (when I could spot one :) Keep writing...waiting for part II

  ReplyDelete
 4. एकदम झकास समीर.....आणि म्हात्रे साहेब पण एकदम जोरात आहे .....आणि त्याला शब्दात मांडणे ते त्याहून अवघड कामं....ते तु(direct अरे-तुरे करतोय..पण अरे तुरे जास्त जवळचे वाटते...म्हणून....) जबरदस्त पद्धतीने मांडलेले....आवडले तुमचे लिखाण.... झकास...

  ReplyDelete
 5. Thanks a million, Avinash, Ashwini, Anoop and Kharadpatti. Motivation kale sathi khoop garejcha asta. Danga suru raheel. :)

  ReplyDelete
 6. समीर, ( तुला सम्या म्हणायला आवडेल!) सुंदर लिहीलाय राव ! मजा आली. त्यातल्या त्यात ते ` चुईंग गम' सारखे चिकटने मनाला भावले.. माझे काही जीवश्च कान्ठस्च वगैरे वगैरे मित्र मला अनपेक्षित ठिकाणी मिळालेत. राजकोट ते अहमदाबाद या बसच्या प्रवासात मला १९९४ मध्ये कोल्हापूर मधला जवळचा मित्र मिळालां, पुण्यात pollution बोर्डातला `साहेब' जो मला महिनाभर appointment देत नव्हता तो आता ` रव्या, भेट न यार, जरा `बसू' निवांत bamboo house ला !' म्हणून फोन करतो...हे सगळ अवघड आहे...आपण ठरवून सुध्धा मित्र ठरवू शकत नाही आणि न ठरवता सुध्धा काहीजण घट्ट घट्ट नाती तयार करतात! लिहित रहा दोस्त,मजा आली!!

  ReplyDelete
 7. सॅडिस्ट माणसं... :) :)
  jiklaayies complete.
  nice turns and twist in story aavadala aaplyala... mast

  ReplyDelete
 8. Sameer ..Tu he Software/IT sodun de..u r best at this..keep writing...

  ReplyDelete
 9. सम्या तुझे लिखाण दिवसेन दिवस निखरत आहे मीत्रा. खरच खूप छान वाटते वाचून. विशेष म्हणजे तुझे आणि नामदेव चे संभाषण. नामदेव ला पहिले नसले तरी डोळ्या पुढे उभा राहिला.
  असाच लिहित राहा.
  - तुझा मित्र
  प्रसाद जहागिरदार

  ReplyDelete
 10. व्व्व्वा! येक्दम आवाडलं!!

  ReplyDelete
 11. Thanks a lot Veerendra, Janmejay, Hemant, Prasad, Ravie. Khoooooooop motivation miltay pudhe janya sathi.

  ReplyDelete
 12. Hey Sam, tuzyaa tyaa naamdev mhatre chyaa naadaat maaza kadhavaayalaa thevalela tup utu gela... khup chaan khiLavun thevalas :) ... keep writing... ekdam fresh likhaaN aahe tuza...

  ReplyDelete
 13. Jhakkas lihala ahes sameer...Continue...:)
  and all the best...

  ReplyDelete