Tuesday, January 11, 2011

१ रेड-बुल, ४ कार, १६ यार, ६०० कि.मी. आणि डर्बन. (...भाग ३...)

साधारण साढे-चारशे की.मी. नंतर मी एक-दोन वेळेला लेन अशिकाही चेंज केली, की मागून हॉर्न मारंतंच काही गाड्या माझ्या पुढे गेल्या. माझं ड्रायविंग अचानक गंडू लागलय हे इतर प्रवासी सांगून सुद्धा मला मान्य नव्हतं. पण मग एक ब्लॅक इसम मागून आला आणि ‘व्हॉट द...’ असले काहीतरी उद्गार कींचाळून पुढे गेला. तो ‘व्हॉट द...’ नंतर काय बोलला, हे ‘फक्तं’ आणि ‘फक्तं’ त्यालाच माहीती. पण जे अति-शहाणे आहेत त्यांना लगेच समजलं. मग मात्र मी मान्य केलं की मला झोप येतीये. दिनेशनी मग लगाम हातात घेतला आणि मी शेजारच्या सीटवर गाढ झोपलो. मागे राजीब आणि नागेश, कॅमेर्यामधून मिळतील ती द्रुश्य घेत होते. १६० च्या वेगामध्ये साठ टक्के फोटो हे अत्यंत निरूपयोगी, वीस टक्के हे अत्यंत हललेले आणि उरलेल्या मध्ये जे नको होतं ते टिपलं गेलेलं. म्हणजे उदाहरणार्थं टेकडीचा फोटो घेताना मधेच एखादा ट्र्क आलाय, चरणार्या गायीच्या फोटोत वीजेचा खांब मधे आलाय, आणि इंद्रधनुष्याचा फोटोत सात ऐवजी एकाच रंगाचा राजीब मधे आलाय. दर फोटो नंतर ‘शिट यार, शिट यार’ हेच ऐकू येत होतं. शेवटी मी दुर्लक्ष केलं आणि डोळे मिटले. मधे-आधे एखादा मॉल सोडला, तर मी पुढचे शंभर की.मी झोपूनच होतो.


काही वेळानी नागेशनी मला उठवलं, ‘सम्या ऊठ, डर्बन आलं लेका जवळ.’

मी डोळे उघडले आणि बारीक पावसातलं डर्बन पहिल्यांदा माझ्या समोर आलं. आता फक्त इमॅजिन! थंडीतली सकाळ आहे. तुम्ही गरम रजाईमधून डोळे मिचमिचत उघडता. तुमच्या बेडरूमच्या खिडकीतून समोरच्या बंगल्याच्या गच्चीकडे तुमचं लक्ष जातं. हिरव्या रंगाचा गाऊन, नाहीतर पंजाबी ड्रेस घातलेली एक अत्यंत सुंदर मुलगी तिथे उभी आहे. डोक्यावरून न्हाऊन आलेली ती कमालीची सुंदर मुलगी, तिचे लांबसडक केस आता टॉवेलने पुसते आहे. आता एका खांद्यावरचे तिचे काळेभोर केस ती हलकेच झटका देऊन दुसर्या खांद्यावर घेते. त्या झटक्यातले काही थेंब तुमच्या चेहेर्यावर येऊन टपकतात. तरी यू प्रेफर टू कीप लुकींग. आणि कुठेतरी दूर ‘पहला नशा, पहला खुमार’ हे गाणं ऐकु येतय. आता ती अचानक तुमच्याकडे बघते, हलकेच हसते आणि... आहाहा! हे द्रुश्य पाहताना तुम्ही काहीजरी बोललात तर तुमच्या तोंडाला `थोबाड' हाच शब्द योग्य असेल. अरे मित्रा हे द्रुश्य नसतं रे; ह्यालाच शायरी म्हणतात! नुसता पहात रहा तू.

डर्बन एंट्री रोड
हे असलंच काहीसं, डर्बनला पहिल्यांदा त्या कारच्या खिडकीतून पहाताना मला दिसलं; ते जणू हिरव्याकंच शालूत नटलेलं डर्बन! काळ्याभोर ढगांना हलकेच झटका देत ते तुम्हाला जणू स्माईल देतं. पावसाचे काही थेंब गालावर पडले तरी ते पुसण्याचं भान मला नव्हतं, आणि तोंड उघडून त्या सीनला पोल्यूट करण्याचा हक्कं सुद्धा माझा नव्हता. मी सी.डी. चेंज केली. धिस मोमेंट नीडेड अ‍ॅन्ड डिजर्वड... ‘मोहम्मद रफी’!

त्या अत्यंत रोमॅन्टिक द्रुश्यात मी हरवलो होतो. रहदारीत सुद्धा एकटाच असल्यासारखा वाटत होतो. आणि मग...

‘अरे सम्या गाणं का चेंज केलं? अरे भो***, ‘शीला की जवानी’ जस्ट लागलेलं ना यार!’ हे थोबाड फक्त नामदेव म्हात्रेचंच असू शकतं. हा ईसम मधल्या एका मॉलमध्ये आमच्या कारमधे कोंबला गेलेला. हा डेटाबेस मधे काम करतो. नो वंडर कालंच ह्यानं मला विचारलं ‘रोमॅन्स म्हन्जी काय रे सम्या?’
कंट्रीवुड रीसॉर्ट
घाट, घनदाट वनराई, अत्यंत पॉश रस्ते, बंगले, गाड्या आणि पोरी. मला वाटायचं जो-बर्ग झकास आहे, बट डर्बन इज ऑसम गाईज! काही वेळातच ‘चेरी-वूड कंट्री रीसॉर्टच्या’ खोलीत आम्ही होतो; एक नंबर रूम्स यार; रॉयल, गोल्डन मेटॅलिक बाथटब-बिथटब! दोघात मिळून एक रूम असं बुकींग होतं. मस्त फ्रेश झालो आणि तिथल्या इमरान मोहम्मद ह्या बांगलादेशी शेफशी आमची ओळख झाली. पांढरे स्वच्छ कपडे, सावळा रंग, केस विरळ, उंची हार्डली पाच-साडेपाच फूट, आणि थोड्याशा पुढे आलेल्या दातामागून अखंड चालू असलेली शिवीयुक्त बडबड. पाकीस्तानमध्ये कराचीत दहा वर्ष काढलेल्या ह्या शेफला डायरेक्ट अन्नपूर्णा देवीनी कुकींग लेसन्स दिले असावेत. अरे यार काय हात ह्या माणसाचा! रोटी, पराठा, मशरूम करी, चिकन, मटन सॉसेज, ऑमलेट, अरे साधा मसाला चहा; काहिही कर. टू गुड. टू..च्च गुड!

पाच वाजलेले, आम्ही कार्स काढल्या आणि बीचवर गेलो. नॉर्थ बीच वर फार गर्दी नव्हती. जागोजागी छोटे पूल बांधलेत. ते समुद्राच्या थोडं आत पर्यंत तुम्हाला घेऊन जातात. त्या पुलाच्या शेवटी, कठड्यापर्यंत आम्ही गेलो. संध्याकाळची थंड हवा लाटांसोबत आमच्या केसांना देखील भरपूर खेळवत होती. ढगांमुळे सूर्यास्त नाही दिसला, पण अत्यंत रोमॅन्टिक मोमेन्ट्स होते ते. मी शांत; इनफॅक्ट सगळेच काहीकाळ शांत! बोलत होत्या त्या लाटा, तो गार घोंगावणारा  वारा आणि मधूनच दूर एका बलाढ्य कार्गो शिपचा मंद भोंगा. शांतता; कधीतरी गरज असते तिची! अत्यंत रॉमॅन्टिक मोमेन्ट मध्ये मला बायकोची आठवण येत असतानाच...

‘दाने खानार का? चायला दोन रँडला पाकीट राव सम्या. लुटून राहीले ना साले!’ एक सावळा हात, अर्धी फोलपटं उडालेले दाणे माझ्यासमोर धरून होता. नामदेव म्हात्रे, दुसरं कोण एक्सपेकटेड! अंगात फॉर्मल हाफ-शर्ट आणि खाली कॉटनची फ्लोरोसन्ट हिरवी थ्री-फोर्थ (अभिदास ब्रॅन्ड). आता मात्र मी म्हात्रे साहेबांच्या खांद्यावर हात ठेवला. एक दाना चघळत त्याला म्हणालो, ‘म्हात्रे, अरे जरा सीन बघ गड्या! आपल्याला पोरगी पटवायची ना एकतरी? तर आधी रोमॅन्स म्हणजे काय ते समजावून घेऊया आज आपण.’ दाण्याचा मोठ्ठा बकणा तोंडात कोंबून म्हात्रेनी थोबाड उघडलं ‘तेच तर तुला विचारून राहीलो ना मी, अन तू मला हा शीन दाखवून राहीला ना यार!’, आता ह्या वर्हाडी माणसाचा लव-गुरू कोण होणार, तुम्हीच सांगा!

सगळ्यांनी मग दना-दन फोटो काढायला सुरवात केली. का कुणासठाऊक, बर्याचजणांना लाटांवरून सूर्यास्ताकडे पहात असल्याची धीर-गंभीर पोज द्यायची होती. प्रोजेक्ट मध्ये ज्याच्या कोड अथवा प्रोग्रॅम मध्ये समिंदरा एवढे डीफेक्ट असतात, त्यालाच विचारवंत पोज देण्यात सगळ्यात जास्त इन्ट्रेस्ट!  म्हणजे विरोधाभासाचा बेस्ट भास त्या फोटोत होत आहे.

इमेजला क्लिक करा
साधारण रात्री अकरापर्यंत आम्ही परत आलो रूमवर. काही जेवले, काहींनी पूल साईड्ला बाटल्या उघडल्या. अगदी बारीक पाऊस सुरू होता. मी जेवलो आणि एक कोक घेऊन मैफीलीत जमा झालो. दुसर्या दिवशी सकाळीच ‘उशाका मरीन वर्ल्ड’ ला आम्ही हजर झालो. उशाका बीच लगतच हे वॉटर-पार्क आहे, एकरावारी पसरलेलं आणि अतिशय खचाखच भरलेलं. पण संध्याकाळपर्यंत नुसता धिंगाणा केला यार! सगळ्या राईड्स झाल्या. मधेच स्नॅक्स, बीयर, कोक आणि पुन्हा नव्या राईड्स. एक अतिशय मोठं आणि निकामी जहाज आता इथे रेस्टॉरंट म्हणून वापरतात. त्याच्या खाली एक भयाण वाटावं असं अ‍ॅक्वेरीयम सुद्धा आहे. जुन्या बुडालेल्या बोटीचा फील दिलाय ह्या अ‍ॅक्वेरीयमला. छोट्याशा ‘गप्पी’ पासून ते अगदी ‘कीलर शार्क’ पर्यंत सगळे दिसतील तुम्हाला. व्हेरी नाईसली मेनटेन्ड!

इमेजला क्लिक करा
‘डॉलफीन शो’ हा देखील एक अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे. मी हा अत्यंत हुशार मासा सगळ्यात आधी दापोलीच्या समुद्रात पाहिलेला. पण इथे हे ट्रेन्ड मासे वेग-वेगळ्या हरकती करून दाखवतात. बॉल उडवणे, उंच जम्प मारणे, असले कर्तब करून दाखवतात. प्रत्येक स्टंट नंतर ह्यांचे कोच यांना छोटे मासे खाऊ घालतात. म्हणजे इथे सुद्धा मोटिवेशन शिवाय काम होत नसतं हे समजलं. यांना मासे तरी मिळतात ओ! मागच्या एका कंपनीत, आमच्या एका पी.एम. नी डिनरच्या नावाखाली पाणी-पुरी खाऊ घातलेली. घरी येऊन रूम-मेटनी ते फ्रस्ट्रेशन दारूमध्ये काढलेलं. जळ-जळ झाली नुसती त्या जल-प्राण्याला बघून!

पण सगळ्यात भारी होता तो ‘ओशन-वॉक’. डाईव्हरचा यूनीफॉर्म घालून मी, हेमंत आणि ह्रीशीकेशनी हा स्टंट केला राव! अत्यंत टाईट असतो हा सूट, म्हणून पोट आत खेचून धरावं लागंत होतं. उगीच फोटोत ओंगळवाणी बॉडी कशाला दाखवा! डोक्यावर ऑक्सीजन हेल्मेट घालून आम्ही समूद्राच्या अत्यंत थंड पाण्यात उतरलो. आधीच एक्सपर्ट्स उतरलेले. त्यात एक अंडर-वॉटर कॅमेरमन होता. पाण्यात आवाज ऐकू येत नाही म्हणून वरतीच आम्हाला काही हँड-सिग्नल्स शिकवलेले. हातवारे करून तुम्ही तुमचा प्रॉब्लेम पाण्याखाली सांगू शकता. त्यातला कुठलाच सिग्नल मला लक्षात नाही राहिला. आर.टी.ओ. च्या परीक्षेत पंचाईत होते ना, तसलंच फीलिंग आलं मला.
स्टिंग-रे आणि आम्ही: इमेजला क्लिक करा

खाली उतरलो आणि तिथेच घाम फुटला एकदम. समोर, माझ्या पाया जवळ स्टींग-रे मासा होता, कमीत-कमी सहा फूट लांब. ह्यात ‘शार्क नाही सोडत ना ओ?’ असा फालतू पण खात्रीशीर प्रश्न मी आधीच क्लीयर करून घेतलेला. उगीच काय राव; पैसे भरा आणि आत्तापर्यंत खाललेल्या मासळीचा हिशोब द्यायला तयार व्हा! तरी काही काळ टरकलेली. सगळे मासे अगदी जवळून पास होत होते. फोटोग्राफर नुस्ता फोटो काढत सुटलेला. कडेलाच काचे मधून आमचे बाकीचे मित्रं आम्हाला पहात, हातवारे करत होते. सो इट्स लाईक यू आर इनसाईड द अ‍ॅक्वेरीयम. एक मासा कसा जगत असेल ह्याचा पंधरा मिनीटात अनुभव मिळाला. जरा महाग आहे हे प्रकरण, पण ‘वर्थ द मनी’! 

अजून थोड्या दंग्यानंतर संध्याकाळी आम्ही पुन्हा रूमवर आलो. मस्तं जेवण; आणि पुन्हा महफील भरली. 

इमेजला क्लिक करा
तिसर्या आणि शेवटच्या दिवशी काहींना ‘महात्मा गांधी फार्म’ पहायच होत, तर काहींना ‘किंग्जमीड स्टेडीयम’ वरती ‘इंडिया - साऊथ अ‍ॅफ्रीका’ टेस्टचा दुसरा दिवस, थोडातरी बघायचा होता. मी ‘गांधी फार्म’ प्रेफर केलं. डर्बनहून साधारण २५ की.मी. वरती ‘पीटर-मॅरीट्झ-बर्ग’ असं स्थळ आहे. शाळेत, इतिहासात वाचलं असेल (आणि अभ्यास केला असेल) तर इथेच गांधीजींना काही ब्रिटिश लोकांनी ट्रेनमधून ढकलल्याचा इतिहास घडलेला. इथेच त्यांनी सत्याग्रहाची सूरूवात केली. त्यांची प्रिंटींग प्रेस, घर, अत्यंत दुर्मीळ फोटो, असं एक संग्रहालय आहे हे. तिथे जायचा अनुभव तर इतका भन्नाट आहे की त्याबद्दल मी नंतर वेगळं सांगतो.

चार वाजलेले. किंग्जमीड स्टेडीयमच्या बाहेर चारही कार जो-बर्गला परत जायला जमल्या. कोणतही विघ्न नाही आलं तर ‘रात्री १२ पर्यंत पोचू आपण’ असा अंदाज बांधला. निघताना थंड, पावसाळी डर्बन धुक्यात लपंत चालंलेलं. संपूर्ण डर्बन तसं टेकड्यांमध्ये वसलेलं आहे आणि एक महानगर असून देखील अत्यंत हिरवं. ‘पी.यू.सी.’ च्या गाड्यांची गरजच नाही. मुख्यत: भारतीय मूळ असलेली लोकं इथे रहातात. २०१० हे वर्ष, भारतीय लोक साऊथ अ‍ॅफ्रीकेत येऊन १५० वर्ष पूर्ण झाल्या बद्दल साजरं केलं जातय. बहूतेक करून आंध्र, तामिळ कींवा गुजराथी भाषिक आहेत आणि आपल्यापेक्षा जास्तं भारतीय. चतुर्थी, गुरूवार, शनिवार, नवरात्री चे उपास ठेवतात हे लोक. मी एकदा अंगारखीचा उपास केल्याचं मला आठवतंय. माझं व्रत आणि धार्मीक निष्ठा पाहून आईनी पुन्हा ‘उपास करणार नाहीस ना?’ ही शपथ घेतली माझ्याकडून. पाच जणांची खिचडी मी एकटा संपवू शकतो ते त्या दिवशी मला आणि घरच्यांना समजलं. पण टेक्नीकली उपास केला ना राव आपण! 

झीरो अ‍ॅल्कोहॉल एनर्जी ड्रींक
परत येताना मात्र झोप येऊ नये म्हणून मी एक रेड-बुल चा कॅन संपवला. थंडीत कधी चिल्ड रेड-बुल कींवा (पीत असाल तर) बीयर ट्राय केलीये का? काय वाटतं यार! त्या एनर्जीच्या जोरावर आम्ही ६०० की.मी. सहज आलो. मधेच उज्वलच्या गाडीनी पंक्चर झाल्याचं टेन्शन दिलं खरं, पण तो फक्त भास निघाला. येताना आरामात आलो आम्ही आणि अंदाजापेक्षा दीड तास आधीच पोचलो रात्री.

‘पुढच्या वीकएंडला जायचं का बे सेंट-लूशीयाला?’ मधल्या सीटवरून नामदेवानी अगदी सिरीयस पणे मला विचारलं. ९०० की.मी पुन्हा जायला तयार झालेले म्हात्रे साहेब; ते सुद्धा ही ट्रिप अजून संपलेली नव्हती तेंव्हा. काहीच भरवसा नाही ह्या माणसाचा! कुठे काय बोलेल, कसं वागेल काहीच सांगू शकत नाही.

रात्री बेडवर आडवा झालो आणि एक अत्यंत सुंदर व्हेकेशन पुन्हा एकदा आठवलं. खरच, कीती रंगीत आणि सुंदर आहे यार लाईफ अ‍ॅन्ड धिस वर्ल्ड! कीती बघण्यासारख्या, अनुभवण्यासारख्या गोष्टी आहेत! तुमचंच शहर, तुमचाच एरीया घ्या की! सगळां पालथा घालून झालाय का? नसेल तर एकदा ट्राय तर करा. पण उगीच मी म्हणतोय म्हणून, चौकशी न करता (अथवा मुद्दाम), नको त्या ठिकाणी जाऊ नका. नाहीतर तोंड काळंनिळं, कींवा तुम्ही स्वत:च तोंड काळं केलत कुठे, तर मी जबाबदार नसतो. वी ऑल आर टूरीस्ट्स! एंजोय एव्हरी जर्नी... बट सेफली!

(...समाप्त...)

धन्यवाद, माझ्या कळकट्ट मित्रांनो आणि सुंदर मैत्रिणींनो! पुढे चालू ठेवावं लिखाण असं वाटत असेल, तर कसं वाटलं हे कमेंट्स मध्ये जरूर सांगा.

मुरलेला ब्लॉगर आणि माझा जो-बर्ग मधला खोली-सखा (उर्फ रूम-मेट) 'नागेश', याच्या प्रोत्साहनामुळेच मी मराठी मध्ये लिहायला  सुरु केलंय. धन्यवाद नॅग्ज! त्याचा ब्लॉग आहे: 

Nagesh Deshpande मी एक हौशी लेखकमाझे इतर ब्लॉग:

11 comments:

 1. समीर मित्रा,

  परत तोडलस....उत्तम लिहितोस..मी सुद्धा अनेक ठिकाणी फिरतो पण हे प्रवास वर्णन मला फारच आवडले,लिहिण्याची स्टाईल साधी आणि डोक्यात 'घुसणारी (जाणारी नव्हे!!),असाच लिहीत राहा. :)
  फक्त एक सावधानी!! झोप आली की त्या क्षणी गाडीचे सुकाणू दुसऱ्याच्या हाती देणे म्हणजे ब्लॉग वर न लिहिता येण्यासारखे शब्द कानावर पडणार नाहीत आणि सुरक्षा सर्वात जास्त महत्वाची नाही का?? :)

  ReplyDelete
 2. Khu Chaan Mala Pahr awadala tuza blog. Mandar Punekar

  ReplyDelete
 3. @Mandar, @ Veerndra: Thanks a lot for the motivation. :)
  @Siddharth: Dhanyawad kautuk ani motivation baddal. Danga chalu rahil. Ani kalji nasavi, gaadi chalavtana kajli ghetli jaail hya pudhe. Thanks a lot. :)

  ReplyDelete
 4. Maste re samya...yaaar lunch jhalywar zope itki yetena mug time pass sathi tujhe zakhaas likhan vaachun chan watte....:)....Jokes apart sarvat avadta part hya article cha mhenje motivation cha...jevha tumchya manager ni party mhenun pani puri khau ghatli tevha tumcha chehra kasa lal lal zhala asel to pudhe ala...:) asach lihit ja mitra....Ghabru nakos me tujha pathishi ahai...ase Swami Samarthe Maharaj mhentat.....

  ReplyDelete
 5. धन्यवाद समीर...
  तुझ्या ब्लॉगवर मला सहभागी केल्याबद्दल.

  हे तीन ही पोस्ट वाचून डर्बन प्रवासात आलेला आनंद पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.

  तुझ्या पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा.

  ReplyDelete
 6. ekdam zyaaak! waiting for snt. Lucie weekend blog...

  ReplyDelete
 7. Dhanywaad Mitranno!
  @Hemant: St. Lucia la ata kadhi shakkya aahe te maheet nahi. Long sutti havi tya sathi punha. Baghu pudhcha pudhe.

  ReplyDelete
 8. समीर, उगाच कौतुक करणं काही आपल्याला जमत नाही ( काय करणार, पुणेकर आहे न!). तुझे सगळेच ब्लॉग वाचले , वाटलं कि तू Software सारख्या क्षेत्रात काय करतोय! छान लिहितोस...सरळ साध्या भाषेमुळे जे लिहितो ते भावत... थोडी पु. ल. आणि जास्त शिरीष कणेकरी छाप जाणवते...दिसामाजी लिहित रहा...कधी हिंजेवाडीला जाताना `वाकड्यात' शिरले कळवा . . . .

  ReplyDelete
 9. खर आहे मला पन शिरीष कणेकरान्ची छाप वाटली, असो, तु जिन्कलस मित्रा..सही म्हनजे सही म्हनजे सहीच..
  असाच लिहीत रहा...

  ReplyDelete