गाडी गेट मधून बाहेर पडली तसं मी मागे वळून बॅक-सीटकडे पाहिलं. राजीबच्या उघड्या तोंडातून एक ओघळ खाली येताना मला दिसला. ह्याचे अर्थ दोनंच; एक म्हणजे गाढ झोप आणि दुसरं म्हणजे अजूनसुद्धा हँग-ओव्हर टाईट होता. शेजारी दिनेश निवांत होत होतेच. मागे नागेश मोबाईलशी चाळा करत होताच. ह्या माणसाला जन्माला घालतानाच देवानी मोबाईल चार्जर का नाही जोडला! म्हणजे मोबाईल डिसचार्ज व्हायचा प्रश्नंच मिटला असता. कधीही बघावं तर हे बटनं दाबतानाच आढळतील आपल्याला. मी मुकाट्याने मान वळवली, एक जांभई दिली आणि लेन पकडली. आमच्या आधीच तीन कार पुढे गेलेल्या. जॉहॅनेसबर्गला इतकं शांत मी आधी कधीच पाहीलेलं नव्हतं; शांत, निश्चल जॉहॅनेसबर्ग.
डिसेंबर आणि जानेवारी महिने हे उन्हाळ्याचे असतात दक्षीण-आफ्रीकेत. पण एक विचित्र उन्हाळा असतो हा. अतीशय गरम होत असताना तुम्ही पंखा चालू केला रे केला, की अचानक ढग दाटून येतात, वीजा भयानकरीत्य चमकू लागतात आणि गारांचा पाऊस सुरु होतो. नंतर इतकी थंडी होते की रजई शिवाय झोपणं अशक्य. आणि गारा सुद्धा लिंबा येवढ्या मोठ्य़ा ओ! ऑन-द-रॉक्स दारूची बेस्ट सोय असते ही. नुस्ता ग्लास बाहेर काढला खिडकीतून की चिल्ड व्हिस्की तयार. (ही फक्त कल्पना. उगीच असंच घडतं साऊथ-आफ्रीकेत म्हणून फुकट अफवा पसरवू नका. चेष्टा होईल!)
आदल्या रात्रीच्या पावसानी कार, हाय-वे, अत्यंत आलीशान बंगले आणि झाडी, थोडक्यात संपूर्ण जो-बर्ग (जॉहॅनेसबर्ग) चिंब झालेलं होतं. स्ट्रीट-लाईट्स च्या प्रकाशात आमच्या चार ‘निसान’ कार्स सरसावत होत्या; तीन पांढर्या आणि एक सोनेरी ‘निसान टिडा’. सद्ध्या परिस्थिती अशीये की रस्त्यावर एक जरी पांढरी ‘निसान टिडा’ दिसली, तर ते आमच्याच कंपनीच कार्टं असणार ही खात्री असते. क्वचितच एखादा दुसरा रंग कार-एजन्सी आम्हाला देते. भरवसा नाही ना ओ, डेंटिग-पेंटिंग चा! कमवणार किती आणि रंगवणार किती!
हाय-वे टच झाला आणि स्पीडोमीटर १२० दाखवू लागला. ८ लेन हाय-वे वरती १२० चं १४०, १५० व्हायला फार वेळ नाही लागला. त्यात आम्ही कॉन्टॅक्ट चुकू नये म्हणून एक छान तंत्र वापरलं. प्रत्येक गाडीला एक नंबर दिला; १,२,३ आणि ४, असे चार नंबर. प्रत्येक ड्रायवरनी आपली पोजीशन याच नंबरवरती ठेवायची. जर कुठे थांबायचं असेल तर पहिल्या क्रंमांकाची गाडी मागच्या गाड्यांना कॉल करून सांगायची. सो देयर इज नो चान्स ऑफ मिसिंग एनीबडी. आपल्या इथे हीच पद्धत वापरतात का ते मला ठाऊक नाही, म्हणून मला आपलं ह्याचं कौतूक. प्रत्येक स्टॉप हा पेट्रोल-पंपावर घेतला आम्ही, कारण इथेच फूड-मॉल सुद्धा असतात.
पूणे ते मुंबई, सोलापूर, बुलढाणा, सातारा, कोल्हापूर ह्या रस्त्यांवरचाच अनुभव माझा; परदेशातला हा पहीलाच एक्स्पीरियन्स. म्हणून इथले रूल्स तोडणं महागात पडू शकतं ह्याचं भान आम्ही ठेवलेलं; म्हणजे काही कीलोमीटर तरी. नंतर काही विचारू नका! रसत्या लगंतची चिन्हं...
‘येथे कॅमेरा आहे, ८० चा वेग सांभाळा’
...हे आधी दरडावून सांगत होते, ते बोर्ड नंतर विनवणी करतायत असं वाटू लागलं;
‘अहो येथे कॅमेरा आहे ओ! प्लीज, म्हणजे बरका, ८० चा वेग सांभाळता आला तर बघा!’.
आणि आम्हीच नियमभंगवाले होतो असं नाही. सगळ्याच गाड्या जणू रॉकॆटचं इंजीन बसवून आल्यासारखा सीन होता. लईच भारी वाटलं यार! नाशिक-फाटा, आळे-फाटा सारखेच इथे अनेक गावांचे, वसत्यांचे फाटे, पहाटेच्या थंड ओल्या वार्यासोबत मागे सरताना दिसत होते. मात्र जो-बर्ग ते डर्बन हा मूळ हाय-वे कूठेही तुटत नाही, किंवा वळत नाही. सरळ रेश मारल्यासारखा रस्ता आहे हा. संपूर्ण ६०० की.मी., ना एक खड्डा, ना रस्त्यावरचा पांढरा रंग पुसट. तुम्ही फक्त स्टीयरींग धरून ठेवा, आणि शेजारून जाणार्या Mercedes मधल्या गोर्या आयटम पोरी चेक-आऊट करत, सफर करत रहा; बस्स! फक्त हातवारे नका करू त्यांना, नाहीतर त्यांच्या सोबत असणारे त्यांचे साडे-सहा फूटी स्नेही तुमची डर्बन ट्रिप बरबाद करू शकतात.
ठीक १५० की.मी. वरती आम्हाला गाडी नंबर ३ चा कॉल आला, ‘शेलच्या पेट्रोल-पंपावर हॉल्ट घे रे.’ लगेचंच डावी लेन चेंज केली आणि काही वेळानी पंपाच्या फूडमॉल समोर गाडी पार्क केली. हनीश, उज्वल आणि हेमंतच्या गाड्या आधीच आळस देत उभ्या होत्या. जो तो गाडी मधून उतरत होता आणि पाठ वाकवून, झालेली झोप पिळून, काढून टाकत होता. एक-दोन जणांनी सिगरेटी पेटवल्या होत्याच. एकानी तर शेजार्च्या डस्ट-बिन मध्ये मोकळी बीयरची बाटली सुद्धा टाकली.
‘चायला सकाळी-सकाळी बीयर होय रे!’
, असं मी विचारल्या बरोबर त्यानं त्याच्या लाल डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. मला नक्की समजेना की झोप जास्तं झाली का बाटल्या? पण जेंव्हा तो मख्खासारखा माझ्याच तोंडाकडे बघत उभा राहिला तेंव्हा मी अंदाज बांधला. म्हणलं ‘चला साहेब, गुड-मॉर्निंग! भ*** ओळखता येत नसेल तर मी सम्या.’
कॉफी झाली, ब्रेड-बटर झालं. ज्यांना सकाळी काही विधी उरकता आले नव्हते ते त्यांनी उरकले. अहो सॉफ्ट्वेअर इंजिनीयर म्हटलं की मध्यरात्रीच्या प्रेशरची सवय आम्हाला, हे पहाटेचं कसं जमायचं!
काही वेळानी कार्स पुन्हा निघणार तोच उज्वलचा मला एक भयानक कॉल आला,
‘अबे कार पंक्चर आहे तुझी; कडेला घे!’
झालं! चारही गाड्या त्याच पंपावर पुन्हा थांबल्या. तेंव्हा सात वाजले होते. थंडाव्यासोबत थोडं ऊन पण होतं.
‘नशीब पंपावर लक्षात आलं सम्या, नाहीतर काही खरं नव्हतं!’, असं सिगरेट पायाखाली चिरडत हेमंत म्हणाला.
मग मी, दिनेश, ह्रिशीकेश असे आम्ही काही, पंक्चरवाल्या काकांना शोधायला गेलो. म्हणलं पंप आहे, आरामात काम उरकेल. कसलं काय! तिथला एक ब्लॅक कर्मचारी, ‘जास्तीत-जास्त स्टेप्नी बदलून देऊ शकतो’, असं म्हणाला.
‘डर्बन मध्ये पंक्चर काढून घेऊ आपण. सद्ध्या स्टेप्नी चेंज करू.’ असं राजीबच म्हणणं पडलं. दॅट मेड सेन्स!
‘आता काय करता, लावा मग स्टेप्नी!’ असं मी अॅक्सेंट मारलेल्या इंग्लीश मध्ये त्या अॅफ्रीकन-ब्लॅक माणसाला म्हणालो.
त्याने स्टेपनी लावली आणि आम्हाला धक्काच बसला ते चाक पाहून! अहो कारच्या ऐवजी लूना कींवा जास्तीत-जास्तं स्प्लेंडरचं चाक वाटावं इतकं लहान चाक होतं ते. त्याला म्हणे ‘बिस्कीट टायर’ म्हणतात. ती फसवेगिरी नसते; त्याला एक ‘अत्यंत नॉनसेन्स’ कारण सुद्धा आहे. तुम्ही पंक्चरच्या दुकानापर्यंत जाऊ शकाल एवढीच सोय आहे म्हणे ती. फार-फार तर ८० चा स्पीड पकडायचा असतो. अहो, जे करिना साईज-झीरो झाल्याचं मला कधीच दु:ख नाही झालं, ते हे चाक साईज झीरोच झाल्याचं पाहून मला झालं. म्हणजे भर युद्धात एखाद्या मातबर सैनिकाला बोर झालं, तर त्याच्या ऐवजी एन.सी.सी. च्या पोराला रनगाडा चालवायला सांगितल्यावर जी अवस्था होईल, तीच त्या टायर मध्ये मला दिसत होती. म्हणजे बाकीचे टायर त्याला कदाचित हिणवत सुद्धा असतील
‘चायला, तू आला होय रे! झालं! अबे आम्ही १६० च्या स्पीडनी आलोय आत्ता पर्यंत. ते मरतुकडं जे डिकीत पडलंय तुझ्याजागी, त्यालाच झेपत नव्हतं!’
फाईव ईयर एक्सपीरीयन्स माणसाच्या रीक्वायरमेन्टसाठी, सहा महिन्याच्या फ्रेशरला जेंव्हा ऑन-साईट पाठवतात, तेंव्हा पी.एम. चा चेहेरा जसा होत असेल, तसा मी दिसत होतो.
`जवळच विलर्स नावाचं गाव आहे. तिथे पंक्चरवाला सापडेल’, त्या स्टेप्नीवाल्या काकांनी पाच रॅन्ड (तीस रूपये) घेत मला सांगितलं. पंक्चर काढायचं आम्ही ठरवलं; नाहीतर क्रिस्मस सोडाच, न्यू-ईयर पर्यंत देखील डर्बन दिसलं नसतं. नशीबाचं चाक हे असच पंक्चर होण्याची सवय ज्यांना असते, त्यांना आयुष्याच्या हाय-वे वरती ही असली स्टेप्नी मंजूर कशी व्हायची!
सात की.मी.वरती आमचं ‘विलर्स’ हे गाव सापडलं; अत्यंत शांत आणि सुबक. टुमदार बंगले, मस्तं दूतर्फी सपाट रोड्स. काही म्हातारे गावकरी कडेला बाकांवर चकाट्या पिटत बसले होते. डोक्यावर हॅट, अंगात जॅकेट आणि पँट, पायात लेदर शूज, आणि काही हातात छ्ड्या; मस्तं जमेलेले सगळे सिनीयर सिटिजन्स. आपल्या पाराची कींवा कट्ट्याची आठवण झाली मला. आपल्या इथल्या म्हातार्यांच्या तंबाखू ऐवजी सिगरेट होती इथे. पण तोच मिश्किलपणा, तीच गेलेल्या आयुष्याची सुखं-दुखं:, आणि त्याच अनुभवानी दाटलेल्या सुरकुत्या. भाषा आणि कल्चर असेल ओ वेगळं; पण आयुष्याची सूत्र; जी आपल्यासाठी, तीच ह्यांच्यासाठी! झुलू असो वा आफ्रिकान्स; ‘आयूष्य’ ह्या शब्दाची परमावली बदलते, अर्थ तोच रहातो. त्यांच्याशी बोललो नाही, पण त्यातल्या एकानी हॅट थोडी उंचावून अभिवादन केलं. मी लांबूनच पुट-पुटलो; ‘मेरी-क्रिसमस अजोबा!’
‘अबे ते म्हातार्यांकडे काय बघत उभा राहिला सम्या!’ सेंटीमेंटल सीन मधून अचानक, दाणकरून, हॉरर सीन मधे आलं तर कसं वाटेल, तेच माझं झालं!
एका ब्लॅक माणसाला आशिष घेऊन आलेला. तो ज्या स्टाईल मध्ये आमचं पंक्चर काढून द्यायला उत्सुक होता, ते पाहून त्याच्या अपेक्षा कीती उंचावल्या असतील ह्याचा अंदाज मी बांधला. पण तो हीरो काहीच कामाचा नव्हता. पंक्चर काढण्यासाठी एजंट असतो हे पहिल्यांदाच पाहिलं. त्यानं एक कॉल केला आणि झुलू भाषेत काही तरी बडबडला तो.
‘दहा मिनीटात माणूस येईल. आज क्रिस्मस आहे ना; काम नाही करत तसं कोणी. तरी आमचा माणूस येईल’,
हे लईच महागात पडणार असं दिसलं. दहा मिनीटात हा माणूस आला; आणि आला तो कश्यामधून, तर चक्कं B.M.W. ! म्हणजे पंक्चर काढणारा जर B.M.W. मधून येऊ शकतो, तर पूर्ण सर्वीसिंग बहूतेक एखाद्या हेली-पॅड वरच होत असेल. तो गोरा होता. त्यानं चाक पाहिला आणि म्हणाला, ‘लगेच करतो, पण ४५० रँड्स (रू. २७००/-) घेईन’. मी मनात म्हणालो, `पंक्चर काढायचय, तुझ्या B.M.W. चा ई.एम.आय नाही भरायला आलोय इथे!' आणि ४८० रँड्स मधे हप्ता देखील नाही होणार ओ त्याच्या गाडीचा! त्याला नकार दिला आणि तो निघून गेला. त्या एजंटनी मग दुसरा कॉल केला. म्हणलं जरा स्वस्तातला बघा साहेब.
बाकी पोरं तोपर्यंत कडेला सिगरेटी, सँडविचं हाणंत होती. गावात एक पोरगी दिसेना म्हणून काहींना ते दु:ख. माझ्या खांद्यावर कोपर टेकवून सुजीत माझ्यासोबत दुसर्या पंक्चर स्पेश्यालिस्ट्चा रस्ता बघत होता. ९.३० चं ऊन पोळू लागलेलं. मी जॅकेट काढून डिकीत फेकलं. तेवढ्यात दुसरे महाभाग आले. हे साहेब आले ‘टोयोटा कॅमरी’ मधून. काय बोलणार ओ! सगळेच ‘नाद नाय करायचा!’ स्टाईलमधेच समोर येत होते आमच्या. अत्यंत जबरदस्तं ‘बास-बीट’ म्यूजिक मध्ये त्या ब्लॅक भाईंनी गाडी थांबवली. १५० घेतो म्हणाला, पण घासा-घीस करून फायनली ८० रॅन्ड्स मध्ये पंक्चर काढला. सात ते दहा; तब्बल तीन तास गेले ह्या पंक्चर एपीसोड मध्ये. पुण्यात असतो तर एकूण अर्धा तास आणि जास्तीत-जास्त दीडशे रुपयां मध्ये हे काम झालं असतं.
ऑल सेट झालेलं पाहिलं आणि आम्ही पुन्हा रोड पकडला. आता निघताना जरा निवांतपणे मी गाव पुन्हा न्याहाळला. गावाच्या मध्यभागी एका चर्चमध्ये मस्तं गर्दी जमलेली. सगळे एकमेकांना ग्रीट करत होते. एका घरासमोर, एक कुटुंब २०१० चा क्रिसमस, आपल्या कॅमेर्यामध्ये टिपून घेत होतं. मला माझ्या घराची आठवण आली. त्या घरात देखील एक आई, एक बाबा, एक बहीण, आणि एक सुंदर मुलगी तिच्या छोट्याशा बाळाला घेऊन फोटो मध्ये कॅप्चर होत होती. फक्त त्या बाळाचे बाबा वाटवे असं कोणी मला नाही दिसलं त्या घरात. कदाचित तो बिचारा सुद्धा परदेशात एखादं पंक्चर काढत उभा असेल, काय सांगावं!
‘चायला घुसलेला खिळा पहिलास का सम्या?’ नागेशनी एका टूथ-ब्रशच्या लांबीचा खिळा माझ्या समोर धरलेला.
‘आता ते कशाला उचललं?’
नागेश उत्तरला ‘एक आठवण म्हणून!’
‘नको त्या शारीरिक भागात घुसला तो, तर दर वेळेला बसताना कायमची आठवण होऊन बसेल. फेका ते बाहेर नागेशराव!’, मी गावाबाहेर पडंत म्हणालो.
हाय-वे पकडला; ‘शिट यार, खूपच वेळ गेला!’, पाण्याची बाटली दिनेशकडून घेत म्हणालो.
ऊन ओसरंत चाललेलं. काळ्या ढगांचं शटर आकाशाला झाकत होतं. मी ‘मुन्नी बदनाम’ एम.पी.थ्री लावली कार मध्ये. ‘डर्बन, ४५० किलोमीटर’ शेजारचा बोर्ड सांगून गेला.
(क्रमश:)
चायला २ भागात संपेल असं वाटलेलं. दोनाचे चार होणार दिसतय!
ठीके, काही हरकत नाही. काही आवडलं-नावडलं तर सांगा बरका मित्रांनो. अभिप्राय खाली ब्लॉगवरच द्यावा. तुमचं जी-मेल अकाऊंट चालतं इथे.
![]() |
आदल्या रात्रीच्या पावसानी कार, हाय-वे, अत्यंत आलीशान बंगले आणि झाडी, थोडक्यात संपूर्ण जो-बर्ग (जॉहॅनेसबर्ग) चिंब झालेलं होतं. स्ट्रीट-लाईट्स च्या प्रकाशात आमच्या चार ‘निसान’ कार्स सरसावत होत्या; तीन पांढर्या आणि एक सोनेरी ‘निसान टिडा’. सद्ध्या परिस्थिती अशीये की रस्त्यावर एक जरी पांढरी ‘निसान टिडा’ दिसली, तर ते आमच्याच कंपनीच कार्टं असणार ही खात्री असते. क्वचितच एखादा दुसरा रंग कार-एजन्सी आम्हाला देते. भरवसा नाही ना ओ, डेंटिग-पेंटिंग चा! कमवणार किती आणि रंगवणार किती!
हाय-वे टच झाला आणि स्पीडोमीटर १२० दाखवू लागला. ८ लेन हाय-वे वरती १२० चं १४०, १५० व्हायला फार वेळ नाही लागला. त्यात आम्ही कॉन्टॅक्ट चुकू नये म्हणून एक छान तंत्र वापरलं. प्रत्येक गाडीला एक नंबर दिला; १,२,३ आणि ४, असे चार नंबर. प्रत्येक ड्रायवरनी आपली पोजीशन याच नंबरवरती ठेवायची. जर कुठे थांबायचं असेल तर पहिल्या क्रंमांकाची गाडी मागच्या गाड्यांना कॉल करून सांगायची. सो देयर इज नो चान्स ऑफ मिसिंग एनीबडी. आपल्या इथे हीच पद्धत वापरतात का ते मला ठाऊक नाही, म्हणून मला आपलं ह्याचं कौतूक. प्रत्येक स्टॉप हा पेट्रोल-पंपावर घेतला आम्ही, कारण इथेच फूड-मॉल सुद्धा असतात.
पूणे ते मुंबई, सोलापूर, बुलढाणा, सातारा, कोल्हापूर ह्या रस्त्यांवरचाच अनुभव माझा; परदेशातला हा पहीलाच एक्स्पीरियन्स. म्हणून इथले रूल्स तोडणं महागात पडू शकतं ह्याचं भान आम्ही ठेवलेलं; म्हणजे काही कीलोमीटर तरी. नंतर काही विचारू नका! रसत्या लगंतची चिन्हं...
‘येथे कॅमेरा आहे, ८० चा वेग सांभाळा’
...हे आधी दरडावून सांगत होते, ते बोर्ड नंतर विनवणी करतायत असं वाटू लागलं;
‘अहो येथे कॅमेरा आहे ओ! प्लीज, म्हणजे बरका, ८० चा वेग सांभाळता आला तर बघा!’.
![]() |
चित्र: जोहॅनेसबर्ग-डर्बन हायवे |
ठीक १५० की.मी. वरती आम्हाला गाडी नंबर ३ चा कॉल आला, ‘शेलच्या पेट्रोल-पंपावर हॉल्ट घे रे.’ लगेचंच डावी लेन चेंज केली आणि काही वेळानी पंपाच्या फूडमॉल समोर गाडी पार्क केली. हनीश, उज्वल आणि हेमंतच्या गाड्या आधीच आळस देत उभ्या होत्या. जो तो गाडी मधून उतरत होता आणि पाठ वाकवून, झालेली झोप पिळून, काढून टाकत होता. एक-दोन जणांनी सिगरेटी पेटवल्या होत्याच. एकानी तर शेजार्च्या डस्ट-बिन मध्ये मोकळी बीयरची बाटली सुद्धा टाकली.
‘चायला सकाळी-सकाळी बीयर होय रे!’
, असं मी विचारल्या बरोबर त्यानं त्याच्या लाल डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. मला नक्की समजेना की झोप जास्तं झाली का बाटल्या? पण जेंव्हा तो मख्खासारखा माझ्याच तोंडाकडे बघत उभा राहिला तेंव्हा मी अंदाज बांधला. म्हणलं ‘चला साहेब, गुड-मॉर्निंग! भ*** ओळखता येत नसेल तर मी सम्या.’
कॉफी झाली, ब्रेड-बटर झालं. ज्यांना सकाळी काही विधी उरकता आले नव्हते ते त्यांनी उरकले. अहो सॉफ्ट्वेअर इंजिनीयर म्हटलं की मध्यरात्रीच्या प्रेशरची सवय आम्हाला, हे पहाटेचं कसं जमायचं!
काही वेळानी कार्स पुन्हा निघणार तोच उज्वलचा मला एक भयानक कॉल आला,
‘अबे कार पंक्चर आहे तुझी; कडेला घे!’
झालं! चारही गाड्या त्याच पंपावर पुन्हा थांबल्या. तेंव्हा सात वाजले होते. थंडाव्यासोबत थोडं ऊन पण होतं.
‘नशीब पंपावर लक्षात आलं सम्या, नाहीतर काही खरं नव्हतं!’, असं सिगरेट पायाखाली चिरडत हेमंत म्हणाला.
मग मी, दिनेश, ह्रिशीकेश असे आम्ही काही, पंक्चरवाल्या काकांना शोधायला गेलो. म्हणलं पंप आहे, आरामात काम उरकेल. कसलं काय! तिथला एक ब्लॅक कर्मचारी, ‘जास्तीत-जास्त स्टेप्नी बदलून देऊ शकतो’, असं म्हणाला.
‘डर्बन मध्ये पंक्चर काढून घेऊ आपण. सद्ध्या स्टेप्नी चेंज करू.’ असं राजीबच म्हणणं पडलं. दॅट मेड सेन्स!
‘आता काय करता, लावा मग स्टेप्नी!’ असं मी अॅक्सेंट मारलेल्या इंग्लीश मध्ये त्या अॅफ्रीकन-ब्लॅक माणसाला म्हणालो.
त्याने स्टेपनी लावली आणि आम्हाला धक्काच बसला ते चाक पाहून! अहो कारच्या ऐवजी लूना कींवा जास्तीत-जास्तं स्प्लेंडरचं चाक वाटावं इतकं लहान चाक होतं ते. त्याला म्हणे ‘बिस्कीट टायर’ म्हणतात. ती फसवेगिरी नसते; त्याला एक ‘अत्यंत नॉनसेन्स’ कारण सुद्धा आहे. तुम्ही पंक्चरच्या दुकानापर्यंत जाऊ शकाल एवढीच सोय आहे म्हणे ती. फार-फार तर ८० चा स्पीड पकडायचा असतो. अहो, जे करिना साईज-झीरो झाल्याचं मला कधीच दु:ख नाही झालं, ते हे चाक साईज झीरोच झाल्याचं पाहून मला झालं. म्हणजे भर युद्धात एखाद्या मातबर सैनिकाला बोर झालं, तर त्याच्या ऐवजी एन.सी.सी. च्या पोराला रनगाडा चालवायला सांगितल्यावर जी अवस्था होईल, तीच त्या टायर मध्ये मला दिसत होती. म्हणजे बाकीचे टायर त्याला कदाचित हिणवत सुद्धा असतील
‘चायला, तू आला होय रे! झालं! अबे आम्ही १६० च्या स्पीडनी आलोय आत्ता पर्यंत. ते मरतुकडं जे डिकीत पडलंय तुझ्याजागी, त्यालाच झेपत नव्हतं!’
फाईव ईयर एक्सपीरीयन्स माणसाच्या रीक्वायरमेन्टसाठी, सहा महिन्याच्या फ्रेशरला जेंव्हा ऑन-साईट पाठवतात, तेंव्हा पी.एम. चा चेहेरा जसा होत असेल, तसा मी दिसत होतो.
ओरिजिनल टायर |
बिस्किट टायर |
`जवळच विलर्स नावाचं गाव आहे. तिथे पंक्चरवाला सापडेल’, त्या स्टेप्नीवाल्या काकांनी पाच रॅन्ड (तीस रूपये) घेत मला सांगितलं. पंक्चर काढायचं आम्ही ठरवलं; नाहीतर क्रिस्मस सोडाच, न्यू-ईयर पर्यंत देखील डर्बन दिसलं नसतं. नशीबाचं चाक हे असच पंक्चर होण्याची सवय ज्यांना असते, त्यांना आयुष्याच्या हाय-वे वरती ही असली स्टेप्नी मंजूर कशी व्हायची!
सात की.मी.वरती आमचं ‘विलर्स’ हे गाव सापडलं; अत्यंत शांत आणि सुबक. टुमदार बंगले, मस्तं दूतर्फी सपाट रोड्स. काही म्हातारे गावकरी कडेला बाकांवर चकाट्या पिटत बसले होते. डोक्यावर हॅट, अंगात जॅकेट आणि पँट, पायात लेदर शूज, आणि काही हातात छ्ड्या; मस्तं जमेलेले सगळे सिनीयर सिटिजन्स. आपल्या पाराची कींवा कट्ट्याची आठवण झाली मला. आपल्या इथल्या म्हातार्यांच्या तंबाखू ऐवजी सिगरेट होती इथे. पण तोच मिश्किलपणा, तीच गेलेल्या आयुष्याची सुखं-दुखं:, आणि त्याच अनुभवानी दाटलेल्या सुरकुत्या. भाषा आणि कल्चर असेल ओ वेगळं; पण आयुष्याची सूत्र; जी आपल्यासाठी, तीच ह्यांच्यासाठी! झुलू असो वा आफ्रिकान्स; ‘आयूष्य’ ह्या शब्दाची परमावली बदलते, अर्थ तोच रहातो. त्यांच्याशी बोललो नाही, पण त्यातल्या एकानी हॅट थोडी उंचावून अभिवादन केलं. मी लांबूनच पुट-पुटलो; ‘मेरी-क्रिसमस अजोबा!’
‘अबे ते म्हातार्यांकडे काय बघत उभा राहिला सम्या!’ सेंटीमेंटल सीन मधून अचानक, दाणकरून, हॉरर सीन मधे आलं तर कसं वाटेल, तेच माझं झालं!
एका ब्लॅक माणसाला आशिष घेऊन आलेला. तो ज्या स्टाईल मध्ये आमचं पंक्चर काढून द्यायला उत्सुक होता, ते पाहून त्याच्या अपेक्षा कीती उंचावल्या असतील ह्याचा अंदाज मी बांधला. पण तो हीरो काहीच कामाचा नव्हता. पंक्चर काढण्यासाठी एजंट असतो हे पहिल्यांदाच पाहिलं. त्यानं एक कॉल केला आणि झुलू भाषेत काही तरी बडबडला तो.
‘दहा मिनीटात माणूस येईल. आज क्रिस्मस आहे ना; काम नाही करत तसं कोणी. तरी आमचा माणूस येईल’,
![]() |
BMW: चित्र फक्तं दर्षवण्यासाठी |
![]() |
Toyota Camry: चित्रं फक्तं दर्षवण्यासाठी |
ऑल सेट झालेलं पाहिलं आणि आम्ही पुन्हा रोड पकडला. आता निघताना जरा निवांतपणे मी गाव पुन्हा न्याहाळला. गावाच्या मध्यभागी एका चर्चमध्ये मस्तं गर्दी जमलेली. सगळे एकमेकांना ग्रीट करत होते. एका घरासमोर, एक कुटुंब २०१० चा क्रिसमस, आपल्या कॅमेर्यामध्ये टिपून घेत होतं. मला माझ्या घराची आठवण आली. त्या घरात देखील एक आई, एक बाबा, एक बहीण, आणि एक सुंदर मुलगी तिच्या छोट्याशा बाळाला घेऊन फोटो मध्ये कॅप्चर होत होती. फक्त त्या बाळाचे बाबा वाटवे असं कोणी मला नाही दिसलं त्या घरात. कदाचित तो बिचारा सुद्धा परदेशात एखादं पंक्चर काढत उभा असेल, काय सांगावं!
‘चायला घुसलेला खिळा पहिलास का सम्या?’ नागेशनी एका टूथ-ब्रशच्या लांबीचा खिळा माझ्या समोर धरलेला.
‘आता ते कशाला उचललं?’
नागेश उत्तरला ‘एक आठवण म्हणून!’
‘नको त्या शारीरिक भागात घुसला तो, तर दर वेळेला बसताना कायमची आठवण होऊन बसेल. फेका ते बाहेर नागेशराव!’, मी गावाबाहेर पडंत म्हणालो.
![]() |
चित्र: ही अतिशयोक्ती आहे बरका! |
हाय-वे पकडला; ‘शिट यार, खूपच वेळ गेला!’, पाण्याची बाटली दिनेशकडून घेत म्हणालो.
ऊन ओसरंत चाललेलं. काळ्या ढगांचं शटर आकाशाला झाकत होतं. मी ‘मुन्नी बदनाम’ एम.पी.थ्री लावली कार मध्ये. ‘डर्बन, ४५० किलोमीटर’ शेजारचा बोर्ड सांगून गेला.
(क्रमश:)
चायला २ भागात संपेल असं वाटलेलं. दोनाचे चार होणार दिसतय!
ठीके, काही हरकत नाही. काही आवडलं-नावडलं तर सांगा बरका मित्रांनो. अभिप्राय खाली ब्लॉगवरच द्यावा. तुमचं जी-मेल अकाऊंट चालतं इथे.
Lai Bhari Rao, Kanch wo tumi...
ReplyDelete@Ashwini: धन्यवाद! अवो पुन्याचे आमी. आवडलं ना तुम्हाला! बस्स! एन्जोय! वाचत रहा, हसंत रहा.
ReplyDeletedonache char kay, 365 epi zale tari chaltil. tuze chalu de 160+ speedne...njoying!!!
ReplyDelete@आश्विनी, @हेमंत: धन्यवाद! मी मराठी मध्ये नवीनच सुरु केलय लिहायला. आधी इंग्लिश मध्येच लिहायचो. तुमचा आणि इतर वाचकांचा प्रतिसाद खूपच महत्वाचा आहे. हसत रहा, कळवंत रहा, बस्स!
ReplyDeletepudhache bhag kadhi yetil?
ReplyDelete@Mannu: धन्यवाद प्रोत्साहन दिल्या बद्दल. नेक्स्ट भाग, लवकरंच मित्रा.
ReplyDeleteअरे समीर आता काय म्हनाव, दुसरा भाग खुपच सहि झाला आहे. सचीन ला एक रन काढ म्हनाव आनी त्याने ६ मारून आनन्द द्यावा, अस झालय...
ReplyDelete३ र्या भागाला सुरुवात करावी... :)