खर सांगू तर हा मराठीतला माझा पहिला ब्लॉग. माझं संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमात झाल्यामुळे मराठी मधून काही लिहायची हिम्मत मी टाळत होतो. ह्याला इंग्रजीच्या टिमक्या वाजवतोय असं समजू नका. आणि काना, मात्रा, उकार गंडले म्हणून कोर्टाची पायरी चढायला लावू नका. पण मराठी ची खरी ओळख झाली ते पु.ल. ह्या दैवतामुळे. त्या मुळे त्यांच स्मरण करतो आणि सुरू करतो, आणि उचलतो ही ‘डम्बेल'.
माझा आणि जिमचा तसा फार जुना संबंध आहे. कारण इतक्या बदलून झाल्या आहेत की आता आमच्या एरीयात अशी एकही जिम नाही उरली जिच्या डंबेलवर माझ्या बोटाचे ठसे नाही मिळणार. "तू नुसता आरंभ-शूर आहेस", असं आमचे तीर्थरूप दर जिमच्या पहिल्या दिवशी प्रोत्साहन द्यायचे. मग ते मोडकाळलेलं अवसान आणि ही मोडकळीस आलेली बॉडी घेऊन मी जिमची पायरी चढायचो. लै चिड-चिड होते राव कोणी इतक खरं बोललं की! महिन्याभरातच आळस नावाच्या एका असाध्य रोगामुळे मी बिछाना धरायचो. ‘मरु देत तिचायला!’ असा विचार दर पहाटे मनात यायचाच आणि मग पुढे काही महिने तरी आईकडे फी मागण्यची हिम्मत नाही व्हायची.
बॉडी बनवायचा नाद हा मला एकट्यालाच होता असं नाही. माझ्या सोबत असे अनेक सलमान जिम मध्ये दिसायचे. ‘सलमान’ ह्या दैवता मुळे तर कीतीतरी जिम मालकांनी आपल्या पोरांची लग्न कम शिक्षणं उरकली असतील. त्याच्या उघड्या अंगाची पोस्टर्स घरात लावून घरांच्या रंगाची पापडी कमी झाली, पण आमच्या बॉडीत काही फरक दिसलाच नाही. नंतर र्हितिक, जॉन, असले अनेक ‘कसलेले’ हीरोज आले. मग काय विचारता! थेटर मधून बाहेर आलो की एक-एकाचे चेहेरे बघायचे. पूर्ण खात्री असायची की उद्याच कुठ्ल्या तरी जिमची पावती आम्ही फाडणार. पाण्यासारखा पैसा वहायला, पण तिथे महिना निघाला तरी डोक्यावरुन पाणी. मग फायनली मी हा नाद सोडला... स्वत:चा पगार टाकायला लागलो तेव्हा पासून.
मी जिम जॉईन केल्या त्या सुद्धा फारच भारी असायच्या; म्हणजे फी नी नव्हे, जिम च्या लायकीनी. इथे एक पॉइंट नोट करा बरका. जिम ही ‘जॉईनंच’ करायची असते. जिम मध्ये नाव नोंदवलय असं म्हणाल तर संस्कार-वर्गात गेल्या सारखं वाटेल. अर्धा मूड तिथेच गेला! तर बॅक-टू-द मूळ मुद्दा; माझ्या जिम्स. माझी पहीली जिम ही आमच्या जुन्या कॉलनीतली. ५ बाय १० च्या खोलीत टेबल-टेनिस च्या टेबल सोबत आणि कॅरम खेळणा-यांच्या शेजारी काही वजनं आणून टाकलेली. एखाद्या स्त्रीला चार-चौघात कपडे बदलताना जितकी लाज वाटेल, तितकीच लाज तिथे सगळ्यान समोर व्यायाम करताना यायची. तो नाद त्यामुळे तिथेच संपला. आपण हातात एखादं वेट उचलल की टेबल-टेनिसचा बॉल मधेच येऊन टपकायचा. त्याची फेका-फेकी करण्यात अर्धा वेळ जायचा. शेवटी फार बोर झालं की हातात त्या वेट ऎवजी रॅकेट यायची. काही दिवसातच कोणीतरी ती वजनंच गायब केली. ती इतकी दुर्लक्षित जिम झालेली, की ती गंजलेली वजनं गेल्याचा पत्ता सुद्धा बरेच दिवस लागला नव्हता.
काही दिवसांनी शेजारच्याच टेकडीवरती एका मोठ्य़ा ग्रूपनी एक स्पोर्ट्स-क्लब सुरु केला, त्यात जिम देखील होती. आधी तिकडे फार गर्दी नव्हती, पण मग सलमानचा ‘वीरगती’ रीलीज झाला आणि टेकडी वर अनेक वीरानची प्रगती दिसू लागली. ती जिम तशी बरी होती, पण त्या सोबत अजून एक प्लस-पॉइंट होता. जिम समोर संध्याकाळी विमेन्स बॅडमिंटन सुरु असायच. आणि ज्यांच्यासाठी इतकी आंगमहनत केली जात होती, त्यांच्या कडे बघण्यात आर्धी फी वाया जाऊ लागली. पहिल्या दिवशी पोरांची तयारी तर काही विचरू नका! नवे शूज, नवी ट्रॅकपॅन्ट, मात्र जुनाच टीशर्ट घातलेली अनेक मुलं तिथे दिसायची. त्या जिम मधे एक मोठ्ठा आरसा होता. जिम मध्ये एखाद्यान हेयरकटिंग-सलून काढलं असतं तर ते जोरात चाललं असतं. त्या आरश्या समोरंच आमचा उरलेला वेळ जायचा. जिम सुरु करुन दोन दिवस नाही झाले की
‘काय यार, बायसेप दिसायला लागलाय बघ’
, हे सत्य आम्ही एकमेकान कडून वदवून घ्यायचो. ज्याच्या चेहे-यावरचा फोड सुद्धा मोठा वाटावा, अशा पोराला स्वत:त अरनॉल्ड दिसू लागायचा. मग माझी आणि माझ्या मित्रांची चालण्याची स्टाईल सुद्धा बघण्याच्या लायकीची असायची. जिची फक्त चेष्टाच होऊ शकेल, असली आपली चेश्ट बाहेर काढायची. हात, कोणी तरी हातात कुबडी दिली की कसे दिसतील, तसे बाहेर निघायचे. आणि चेहे-यावर हाव-भाव म्हणजे ‘आपल्या नादाला लागशील तर लैच महागात पडेल!’ असला असायचा.
माझी दुसरी जिम ही एक दुस-या कॉलनीत सापडली. माझ्या अंदाजे तेव्हा र्हीतिकचा ‘फ़ीजा’ सूपरहिट झालेला. अॅज यूज्वल अनेक मित्र होतेच सोबत. कॉलेज सुटलं (म्ह्णजे आमच्या सोयीनुसार आम्ही कॉलेज मधून बाहेर पडलो) की आम्ही त्या कॉलनीत जाऊ लागलो. तिथे जॉईन करायचं दुसरं कारण म्हणजे ती जिम फुकत होती. एका मित्राचा वषिला लागला आणि आय-कार्ड सुद्धा बनलं. ‘जे फुकट, ते उपट मुळा सकट’, ह्या तत्वा खाली अनेक आय-कार्डं दना-दन बनत गेली आणि एके दिवशी तिथे हॉटेलासारखी वेटिंग-लिस्ट पद्धत सुरू झाली ओ! ५ वाजता आलेला माणूस, ५.३० ला जिम मध्ये स्वत:ला कोंबू लागला. ‘कोंबणे’ हाच शब्द बरोबर आहे इथे. डम्बेल उचलली की शेजारचा च्या पॅंट्च्या खिष्यात दांडकं आडकायचं. मग तो एक भुवई वर करून आपल्याला खतरनाक ‘लुक’ देणार. आया-बहीणींना ज्या जिम मध्ये मज्जाव होता, त्या जिम मध्ये पोरांच्या तोंडून त्यांचा उद्धार व आठवण करून देण्यात यायची. शाळेत जो सीन असतो, तोच तिथे दिसू लागला; ऎंशी पोरानसाठी एक टीचर, त्याच हिशोबानी पन्नास पोरांसाठी एकच कोच, आणि तो सुद्धा अर्धा-अधीक वेळ मोबाईलवर गर्लफ़्रेंड च्या मागे. बेंचवर एखादा वजनदार माणूस आडवा, तो कालांतरा पर्यंत आडवाच. तो उठला की त्याची घामानं थबथबलेली पाठ त्याच्या अस्तित्वाची आणि वजनाची जाणीव बेंचवर सोडून जायची. बेंच सुद्धा महाराजानच्या वेळचा वाटावा इतका जरा-जीर्ण. त्याच्यावर आपण आडवे झालो की परत वर उठताना त्या स्पंजातला हजारो वर्षान पासून साठलेला घाम, गोंदवल्यासारखा आपल्या टी-शर्टवर छापला जायचा. पूर्वी चाळींमधे संडासा समोर लोकं जशी थांबायची, तसे आम्ही डम्बेलसाठी रांगेत थांबायचो. हातात आधी वापरलेली डम्बेल टमरेला सारखा धरून रांग पुढे सरकायची. समोरच्या ३ बाय ५ च्या आरश्यात एकूण ३५ जणं स्वत:ला निरखू लागली. दोन आठवडेच झाले होते आणि अचानक मला माझा ट्रायसेप दिसू लागला. ‘काय यार, ट्रायसेप कसला खतरनाक झालाय बघ माझा!’ असं मी शेजारच्याला माझा टव-टवीत ट्रायसेप न्याहाळत म्हणालो. ‘मित्रा, तो हात माझाय’ असं तो म्हणल्या बरोबर मी दुस-या दिवसापासून ती जिमंच बंद केली.
काही वर्षांनी आम्ही घर बदलले. नव्या कॉलनीत आलो तेंव्हा तीर्थरुपांनी एक गूड-न्यूज दिली, ‘अरे आपल्याला जिम फ़्री आहे बरका, जात जा.’ ती जिम खरंच हाय-क्लास होती. ए.सी., म्यूझिक, सुशिक्षीत र्टेंड कोच, आणि सगळ्यात भारी म्हणजे मुला-मुलींची बॅच एकाच वेळी. मी त्या जिम मधे नियमीत जाऊ लागलो. पोरींसाठी नाही ओ, तर शप्पत सांगतो बॉडी बनवायचीच होती आपल्याला. नियमीत जात होतो दोन महीने तरी. नंतर मात्र कंपनी मधल्या एका बलाढ्यं प्रोजेक्ट्नी माझं जीणं हराम केलं. रात्री एक, दोन वाजता जेंव्हा एक सॉफ़्टवेअर इंजिनीयर घरी येतो तेंव्हा स्वत:चंच शरीर एक सत्तर किलोच चेस्ट-बार वाटू लागतं. जिम तर सोडाच पण घरच्यांना सुद्धा वेळ देण मुश्कील होऊन बसतं. हळू-हळू बॉडी वरून एक इंजिनीयर नो-बॉडी होत जातो. पण मी अजूनही हार नाही मानलेली. आता तर ‘स्टेट-ऑफ़-द-आर्ट’ जिम्स आल्या आहेत पुण्यात. त्यांचे फीड-बॅक फॉर्म आणि इयरली फी बघूनंच तुमचा घाम निघू लागतो. एका फोर्म मधे तर, का कुणास-ठाऊक, माझ्या एक मित्राला आजोबांचं नाव आणि बाकी डीटेल्स विचारलेले. नंतर त्यांना फोन करून जिम लावायची याचना सुद्धा केलेली. आता ते आहेत नव्वदीचे. तंबाखूची पूडी उचलताना सुद्धा त्यांचा हात लट-लटंत असतो. चोळलेली तंबाखू सरळ तोंडात जाताना अर्धी त्यांच्या बंडीवर पडते. असल्या जक्खं म्हाता-यासाठी एखादा डायट-प्लॅन सुद्धा फ़क्त चतकोर पॊळीचा असेल. पण ‘बिजनेस ऑपॉर्च्यूनिटी’ जिथे, तिथे नव्वदीतल्या सुरकुत्या सुद्धा बायसेप-कट्स वाटत असतील, काय सांगावं!
तर, ह्या आणि अशा अनेक घटनांनी माझं ‘जिम’न चरीत्र लिहिता येईल.
एक-न-एक दिवस माझी बॉडी बनेल ही आशा आणि हीच मारुतीराया पुढे प्रार्थना. जय
हनूमान! जय सलमान!
कॄपया आपल्या कमेंट सोडाव्यात. एका गरीब, गरजू लेखकाला तेच प्रोत्साहन आणि तीच शिकवण. इथे तुमचं ‘जी-मेल’ अकाऊंट सुद्धा चालतं बरका!
माझे इतर ब्लॉग:
खूपच छान रे मित्रा !!!
ReplyDeleteआवडला आपल्याला !!!
म्हणजे एक नंबर आहे !!!
Waah Samya...waah !
ReplyDeletePan Jim and Body building ha topic kasa kay suchala re ?
Tikde Jim sathi kiti ZAR mojave lagtat re ???
-Prasad Jahagirdar
chngala aahe likhan...keep it up...
ReplyDeleteEnglish madhyam watan nahi....
ReplyDeleteLikhan chhan ahe!
Vishay ani likhan donhi awdll
sameer sahi re mast ahe pan ek vicharache ahe
ReplyDeleteविमेन्स बॅडमिंटन kahi jamle ka nahi teva
Khupach sahi lihila aahes....Good Job! Nice try to have one of ur blogs in Marathi :) ..keep up the good work
ReplyDeleteजबरदस्त लिहल आहेस मित्रा...आवडल.
ReplyDeleteLaiiiii bhari ahai rao...aplya yogayog che vaachun te athvan taze zhale....ajun aplya yogagyog che kisse athav ani tyacha seperate blog banav.....
ReplyDeleteHi Sameer, Ekdam Zakas Vatle bagh tuza blog vachun. Nakkich P.L. Punyache ahet confirm zale. Tu asach lihit ja.
ReplyDeleteHi Sameer ! Gr8 yar! Tu jar na pita etke changle livu shaktos tar pyaylyavar ....can't imagine. Ekdam hit leka......
ReplyDeleteWah!... Sameer.
ReplyDeletekya baat hai..... u have nice observation skill.
keep writing bro...
best re....majhya a-marathi project manager la sangital, tyalahi avadal. tyala aata hech english madhye pahije :)
ReplyDeleteEkch number :)
ReplyDeleteDusara numberch nahi :)
mast re...shabd khoop chaan mandale ahet,,,vachatane hune diwas athavale,,,surekh shabd rachana ahe
ReplyDeleteधमाल आली वाचनामध्ये वर्णन खूपच छान
ReplyDelete@Rahul: Dhanywaad Mitra! Please keep reading!
Deletewww.facebook.com/kaaysangurao
This comment has been removed by the author.
ReplyDelete